Pune Women Murder News Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Pune Women Murder News : पुण्यातील बिबवेवाडीत पतीने पत्नीची हत्या करून ती इमारतीवरून पडल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तपास करत आरोपी पतीला अटक केली आहे.

Akshay Badve

  • पुण्यातील बिबवेवाडीत पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना

  • पतीने अपघाताचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

  • पोलिसांच्या तपासात खून उघड

  • आरोपी पती अटकेत

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी येथे चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून ती इमारतीवरून पडल्याचा बनाव रचण्यात आला. इतकेच नाहीतर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आरोपी पतीने पत्नीला रुग्णालयात दाखल करत पोलिसांना फसवण्याचा प्लॅन केला. मात्र पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केला. शुभम श्रीकांत घोडकेला अटक केली. तर या घटनेत सारिका घोडके हीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही सगळी घटना पुण्यातील बिबवेवाडी येथे घडली. सारिका आणि शुभम यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पती शुभम वारंवार सारिकावर संशय घेत होता. २४ मार्च रोजी त्यांच्यात वाद झाले आणि रागाच्या भरात शुभम ने सारिका ला मारहाण केली. इतकचं नाही तर स्वयंपाक घरातील अनेक वस्तूंनी तिच्यावर वार केले. मारहाणीत सारिका गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सारिका ला पती ने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीतच पोलिसांना संशय आला. दरम्यान, पोलिसांनी पती शुभम कडे चौकशी करण्यास सुरुवात केली. शुभम ने सारिका ‘गॅलरीतून पडल्याने मृत्यू झाला’ असा दावा केला. घटनास्थळावरील परिस्थिती आणि जखमांचे स्वरूप पाहता पोलिसांचा संशय वळवला. संबंधित घटनेचा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केलं असता हा अपघात नसून खून असल्याचं स्पष्ट झालं.

पोलिसांनी पुन्हा शुभमची चौकशी केली. यावेळी शुभम उत्तर देताना अडखळत होता. पोलिसांचा संशय बळावला आणि त्याच्या विरोधात पुरावे सापडल्यानंतर शुभमला तात्काळ ताब्यात घेतले आणि खाकी चा हिसका दाखवताच पत्नीची हत्या केल्याची त्याने कबुली दिली बिनवेवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची तात्काळ मदत

AIमुळे बँकांमध्ये नोकर कपात? जगावर बेरोजगारीचं सावट

हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; 'लव्ह जिहाद'ने अकोला हादरले

LPG Latest Updates: गॅस टंचाईदरम्यान LPG, CNG आणि PNG बाबत सरकारचा मोठा निर्णय

Jowar Chakli Sticks: झणझणीत ज्वारी स्टिक्स रेसिपी, घरच्या घरी करा हेल्दी स्नॅक्स

SCROLL FOR NEXT