pune crime saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : काम व्यवस्थित कर... सततच्या सूचनांना कंटाळला, वैतागलेल्या वेटरनं हॉटेल चालकाला संपवलं

Pune News : हॉटेल चालकाकडून वारंवार काम व्यवस्थित करा अशा सूचना येत असल्याने वेटर वैतागला होता. रागाच्या भरात वेटरने हॉटेल चालकाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी वेटरला ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

  • पुण्यात कोंढवे धावडे येथे वेटरने हॉटेल चालकाचा धारदार चाकूने खून केला.

  • वारंवार काम व्यवस्थित कर अशा सूचनांमुळे वैतागून वादातून हत्या घडली.

  • पोलिसांनी आरोपी वेटर दिलीप गिरीला ताब्यात घेतले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात कोंढवे धावडे येथे एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने हॉटेल चालकाचा खून केला आहे. कामगाराने शुल्लक कारणावरुन रागाच्या भरात हॉटेल चालकाला संपवले. मानेवर धारदार चाकूने वार झाल्याने हॉटेल चालकाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कोंढवे धावडे येथील हॉटेल चालक संतोष शेट्टी (वय ४५ वर्ष) यांचा हॉटेलमधील एका वेटरने चाकू खुपसून खून केला. सदर घटना मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ-पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

संतोष शेट्टी यांची हत्या केल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी हॉटेलमधील वेटर दिलीप गिरी (वय ३९ वर्ष) याला ताब्यात घेतले आहे. दिलीप गिरी हा मूळचा लातूरचा आहे. संतोष शेट्टी हे दिलीप गिरीला काम व्यवस्थित कर अशा सारख्या सूचना देत होते. काही दिवसांपूर्वीच दिलीप गिरी हॉटेलमध्ये कामावर लागला होता.

दिलीप गिलीने कामावर लागल्यानंतर लगेच मालकांकडून अडीच हजार रुपये आगाऊ घेतले होते. त्यानंतरही तो आणखी पैशांची मागणी करत होता. यावरुन शेट्टी यांनी त्याला आधी काम व्यवस्थित कर असे बजावले होते. यावरुन मंगळवार (२६ ऑगस्ट) रात्री दोघांमध्ये वादावादी झाली. शेट्टी बसलेले असताना गिरीने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि बेसाध असलेल्या शेट्टी यांच्या मानेवर धारदार चाकूने दोनदा वार केला. हल्ल्यात शेट्टी यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे मेट्रोची वाहतूक आता रात्री २ वाजेपर्यंत

Toxic Relationship: तुमच्यासोबतही 'या' गोष्टी घडतात का? मग तुम्हीही एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात

Russia-Ukraine War : दहशत आणि क्रूरतेचा कळस! रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच रात्रीत डागल्या ६२९ मिसाइल

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांसाठी दोन पक्षांची युती, एकत्र लढणार, पुढच्या बैठकीत ठरणार प्लान

Maharashtra Politics: गणपती दर्शनाआधी एकनाथ शिंदे–राज ठाकरे यांची बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा|VIDEO

SCROLL FOR NEXT