Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! भरचौकात गोळीबाराचा थरार, दोघांवर धाडधाड गोळ्या झाडल्या

Pune Firing: पुण्यामध्ये दोन गोळीबाराच्या घटना घडल्या. भरचौकात या घटना घडल्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Priya More
  • पुण्यात घोरपडे पेठ आणि लोहियानगर येथे गोळीबार

  • दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या

  • पहिल्या घटनेत एक तरुण गोळी लागून गंभीर जखमी झाला

  • दुसऱ्या घटनेत तरुणावर गोळीबार झाला पण तो थोडक्यात बचावला

अक्षय बडवे, पुणे

गोळीबाराच्या दोन घटनांमुळे पुणे हादरले आहे. पुण्यातील दोन वेगवेगळ्या परिसरात शुक्रवारी हा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. पुण्यातील खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठ आणि लोहियानगरमध्ये या घटना घडल्या या घटनेमुळे एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूर्ववैमनस्यातून या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या घटनांचा तपास करत असून एका घटनेतील ५ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

पहिली घटना -

पुण्यातल्या घोरपडे पेठ पोलिस चौकीपासून काही अंतरावर अनुसया टॉवर्ससमोर सकाळच्या सुमारास ही गोळीबाराची घटा घडली. पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ख्वाजाउद्दीन नजीर शेख उर्फ नुरु शेख (वय २८, रा. गणेश पेठ) यांच्या नातेवाइकाने काही वर्षांपूर्वी आरोपीच्या वडिलांस मारहाण केली होती.

या जुन्या वादातून दुचाकीवरून आलेल्या सुजल उर्फ चिम्या सुनील परदेशी (वय २१, रा. कासेवाडी) आणि त्याच्या साथीदारांनी नुरु शेख याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी नुरु शेख याच्या पाठीत लागल्याने तो जखमी झाला. आरोपी सुजल परदेशी यालागोळी चुकल्याने एक जण बचावला.

दुसरी घटना -

लोहियानगर भागात जुन्या वादातून तीन हल्लेखोरांनी ओम्या गायकवाड या तरुणावर गोळीबार केला. आरोपींनी ओम्यावर गोळी झाडली; मात्र सुदैवाने गोळी चुकल्याने तो बचावला. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दोन्ही प्रकरणांत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेतील फरारी आरोपींचा पोलिस शोध घेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर त्याचे साथीदार जय उर्फ पियुष अनिल परदेशी (वय २२), सोनू उर्फ मॉन्टी अनिल परदेशी (वय २९, रा. कासेवाडी), विकी राजू परदेशी (वय ३५, रा. मार्केट यार्ड) आणि नितेश उर्फ बॉबी संतोष रिकीबे (वय २०, रा. घोरपडे पेठ) या संशयित आरोपींनाही अटक केली. आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

EVM सोडा, बॅलेट पेपरवरही भाजपचा एकतर्फी विजय; विरोधकांची अवस्था पाहून बसेल धक्का, पाहा निकाल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक

17th October Bank Holiday: शनिवारी बँक सुरू राहणार की बंद? RBI कडून मोठी अपडेट, ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Shevayachi Kheer Recipe: यंदाचा दसरा करा खास, घरी बनवा पारंपरिक आणि चविष्ट शेवयांची खीर, वाचा खास रेसिपी

SCROLL FOR NEXT