Sharad Mohol Case Update News Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Mohol Case: शरद मोहोळ हत्या प्रकरण: मुख्य आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणे न्यायालयीन कोठडीत; मुख्य सुत्रधार अद्याप फरार

Sharad Mohol Death Case: शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर या गुन्ह्याचा सूत्रधार गणेश मारणे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता.२५ जानेवारी २०२४

Sharad Mohol Death Case Update:

कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर या गुन्ह्याचा सूत्रधार गणेश मारणे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील (Pune) कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणात काही दिवसांपुर्वीच विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांना अटक करण्यात आली होती. या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. ज्यानंतर विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फरार गणेश मारणे आणि अटकेतील आरोपी यांच्याकडे एकत्रित तपास करण्याकरिता त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र ही मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणात विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. सध्या पोलीस गणेश मारणेचा शोध घेत आहेत. आरोपी गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT