सचिन जाधव, प्रतिनिधी...
Pune Crime News: सध्या तरुणाईमध्ये रिल बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे. अनेक तरुण- तरुणी सोशल मीडियावर अश्लिल, तसेच दहशत माजवणारे रिल्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक तरुण या रिल्समधून गुन्हेगारीचेही समर्थन करत असतात. अशीच रिल बनवणे पुण्यातील एक तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. (Crime News in Marathi)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील (Pune) एका तरुणाला गुन्हेगारीचे समर्थन करणारे रिल बनवणे चांगलेच महागात पडले आहे. महम्मदवाडी येथील तरवडे वस्तीमधील एका २० वर्षीय तरुणाने रिल्स तयार करुन सोशल मीडियावर प्रसारित केले होते. "हे हडपसर गाव आहे, इथं दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते" असे रिल तयार करून त्याने पोलिसांना आव्हान दिले होते.
सोशल मीडियावर (Social Media Reel) हे रिल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेतला. पोलीस तपासात त्याच्याकडे लोखंडी हत्यार आढळून आले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेवून तरुणाला समज दिली असून त्या तरुणाने व्हिडिओद्वारे माफीनामा तयार करून दिला आहे. ‘मी गुन्हेगारीचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला. त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. यापुढे अशी चूक होणार नाही,’असे त्या तरुणाने माफीनाम्यात म्हणले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.