Kalyani Deshpande
Kalyani Deshpande  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला मिळाली ७ वर्षाची सक्तमजुरी; कोण आहे कुख्यात कल्याणी देशपांडे?

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : पुण्यातील वेश्या व्यावसायच्या माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसविणाऱ्या व संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडे सह दोघांना विशेष न्यायालयाने ७ वर्ष सक्तमजुरी आणि १० लाखाचा दंड ठोठावला आहे. महत्वाचे म्हणजे पिटा आणि मोक्काच्या गुन्ह्यातील झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचे बोलले जात आहे. जाणून घ्या कुख्यात कल्याणी देशपांडेबद्दल. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात (Pune) ९० च्या दशकापासून वेश्याव्यवसाय प्रकरणात कल्याणी देशपांडेचे नाव जोडलं गेलं आहे. कल्याणीचे नाव पहिल्यांदा २००० साली पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर आलं. सामान्य घरात जन्म घेऊन कल्याणीने पुण्याच्या टॉप दलालांच्या यादीत पोहोचली. कल्याणीवर आतापर्यंत २४ गुन्हे दाखल झाले आहेत.

पिटा आणि मोक्काच्या गुन्ह्यातील झालेली ही पहिलीच शिक्षा देण्यात आली आहे. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी या प्रकरणात युक्तीवाद करताना कल्याणीसहित दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

कोण आहे कल्याणी देशपांडे?

कल्याणी देशपांडे ही पुण्यातील तिच्या बंगल्यात वेश्याव्यवसाय चालवत होते. पुण्यातील सुस रोड येथील बंगल्यात वेश्याव्यवसाय चालवत होते. याच बंगल्यात डिसेंबर २००७ मध्ये कल्याणीचा सहकारी अनिल ढोलेची या बंगल्यात हत्या झाली होती.

अनिल ढोले हा वेश्याव्यवसायासाठी मुंबईतून मुली आणायचा. मात्र, ढोलेच्या हत्येनंतरही कल्याणीचा धंदा सुरू होता. तसेच कल्याणी देशातील अन्य भागात आणि विदेशातही मुली वेश्याव्यवसायासाठी पाठवत होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walk After Meal: जेवणानंतर किती वेळ शतपावली करणं आरोग्यासाठी फायद्याचे?

Plate Served Method: जेवणाचे ताट वाढण्याचीही असते योग्य पद्धत, जाणून घ्या

Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

Today's Marathi News Live: जयंत पाटील ठरले 'शतकवीर', लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेतल्या १०० सभा

Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT