Pune News Today Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News Today: वारजे कॅनाॅल रस्त्यावर 5 गाड्यांच्या काचा फोडल्या; रामनगर परीसरात पोलीस गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी

Dnyaneshwar Choutmal

Pune News Today: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता पुण्यातील वारजे येथील रामनगर कॅनाॅल रस्त्यावर उभ्या असलेल्या एकूण 5 गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन रिक्षा आणि ३ कारचा समावेश आहे. (Latest Marathi News)

वारजेतील रामनगर कॅनाॅल रस्त्यावर सोमवारी (19 जून) पहाटे चारच्या सुमारास घडली. काळ्या रंगाच्या दुचाकी वरून आलेल्या अज्ञात 3 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता  नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे. याबाबत स्थानिक गाडी मालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वारजे माळवाडी पोलीस (Police) घटनास्थळी दाखल होत घटनेची माहीती घेण्याचे काम करत आहे.

2017 नंतर रामनगर परीसरात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार थांबला होता. परंतु दोन दिवसांपूर्वीच याच रामनगर परीसरात गोळीबार घडल्याची घटना ताजी असतानाच टवाळखोरांनी पुन्हा एका डोकं वर काढलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरीक संतप्त झाले आहेत. आरोपींवर योग्य ती कारवाई करीत रामनगर परीसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (Pune News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT