Pune Crime News wife ordered her husband to be killed But accused took Extortion from him Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: विभक्त राहणाऱ्या बायकोने चक्क नवऱ्याची दिली सुपारी; पण त्यानेच केला घात, नेमकं काय घडलं?

Pune Latest Crime News: विभक्त राहणाऱ्या एका पत्नीने आपल्या पतीची सुपारी दिली. पण ज्याला सुपारी दिली, त्यानेच घात केला.

साम टिव्ही ब्युरो

Pune Latest Crime News: नवरा-बायकोचा वाद होणं ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना नवरा-बायकोत नेहमी वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात. तर काहीवेळा ते विकोपालाही जातात. यातून पुढे गंभीर गुन्हे घडतात. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. विभक्त राहणाऱ्या एका पत्नीने आपल्या पतीची सुपारी दिली. पण ज्याला सुपारी दिली, त्यानेच घात केला.

सुपारी घेणाऱ्या आरोपींनी महिलेच्या पतीचे अपहरण केले आणि ठार मारण्याची धमकी देत घरात जबर चोरी केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडकी परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

याप्रकरणी डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी १० अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, की फिर्यादी हे जनावरांचे डॉक्टर आहेत.

त्यांची आणि पत्नीची घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात केस चालू आहे. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना फोन आला. वडकी गायकवाड रोड या ठिकाणी कुत्रे आजारी पडली असून त्याच्या उपचारासाठी बोलावून घेतले.

फिर्यादी त्या ठिकाणी केले असता, दोन ते तीन लोकांनी नंबर प्लेट नसलेल्या चार चाकी गाडीत जबरदस्तीने त्यांना बसवले. त्यांचे अपहरण करत ठार मारण्याची धमकी दिली आणि पैशाची मागणी केली. फिर्यादी यांच्या गळ्याला चाकू लावून तुझ्या नावाची तुझी पत्नी आणि मेहुण्याने सुपारी दिली आहे, असं म्हणत आरोपींनी धमकावले.

तुला आम्ही संपून टाकणार आहोत. तू आम्हाला २० लाख रुपये दिले तर आम्ही तुला सोडून देऊ, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असे म्हणून फिर्यादीला राहत्या घरी घेऊन आले. फिर्यादी कडून घराच्या चाव्या घेतल्या आणि जबरदस्तीने घरातील दागिने आणि रोख रक्कम अशी २७ लाख १० हजार रुपये घेऊन गेले.

दरम्यान, या घटनेनंतर डॉक्टरने तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी १० अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT