Pune Crime News SAAM TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात चाललंय तरी काय? दारु पाजली नाही म्हणून तरुणाच्या पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर; खळबळजनक घटना

Pune Latest News: सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास नेपियर रोड वानवडी परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: दारू पाजली नाही म्हणून एकाला मारहाण करून पोटात स्क्रू-ड्रायव्हर खुपसल्याची घटना धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास नेपियर रोड वानवडी परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सनी ऊर्फ बाबा रणजित टाक (वय 28, रा. वानवडी), नावेद शेख (वय 29) या दोघांना अटक केली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगन सोमनाथ हरियाली (वय 35, रा. पिंपरी-चिंचवड) आणि त्याचा मित्र हे दोघे लघुशंकेसाठी थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी दोघांसोबत दारू पाजली नाही, या कारणातून वाद घालण्यास सुरुवात केली.

त्या वेळी आरोपीपैकी एकाने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण करीत स्क्रूड्रायव्हर त्याच्या पोटात खुपसला. तसेच दगड मारुन जखमी केले. या प्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाची हत्या

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा भागात भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT