Jaykwadi Dam : 'जलसंपदा' च्या कामकाजा विराेधात हर्षदा काकडेंसह शेकडाे शेतकऱ्यांनी छेडलं मुक्काम ठोको आंदोलन

ताजनापूरचे काम खूप दिवसांपासून रखडल्याने शेतकरी आक्रमक झालेत.
harshada kakade, nagar, jaykwadi dam
harshada kakade, nagar, jaykwadi damsaam tv
Published On

- सुशील थोरात

Nagar News : जायकवाडी धरणातील आपले हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर "मुक्काम ठोको" आंदोलन सुरू केले आहे. नगर जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले सुरू केले आहे.

harshada kakade, nagar, jaykwadi dam
Dhobli Mirchi Price Drop : सर्वसामान्यांना दिलासा, शेतकरी चिंताग्रस्त; कोथिंबीर, मेथीपाठोपाठ ढोबळी मिरची झाली स्वस्त

जायकवाडी धरणातील 1.6 टीएमसी पाणी ताजनापूर साठी राखून ठेवण्यात आले आहे. त्याचा फायदा नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गावांना होणार होता. परंतु ताजनापूरचे काम खूप दिवसांपासून रखडल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करावं लागत आहे. (Maharashtra News)

शेवगाव तालुक्यातील 9 गावांना याचा फायदा होणार होता. दरम्यान ही योजना सरकारी लालफितीत अडकल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. सर्वेक्षण पूर्ण करण्याची तारीख द्या, प्रकल्पाचे काम कधी सुरु करणार? याच्या तारखा लेखी द्या अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. जलसंपदा विभागाच्या आवारातच मुक्काम ठोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com