Pune Crime News:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: शिवाजीनगर ब्रीजखालील नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; पुणे शहरात खळबळ

Pune Crime News: व्यक्तीची ओळख अद्याप पटली शकलेली नसून ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील नदीमध्ये एक तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. शिवाजीनगर ब्रीजखाली हा मृतदेह आढळला असून याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातील ब्रीजखाली आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबतची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह पुरुष व्यक्तीचा असून त्याचे वय 55 ते 60 च्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच या व्यक्तीच्या डोक्याला मार लागलेला असून गुडघ्यालादेखील जखम झाली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली शकलेली नसून ही हत्या आहे का आत्महत्या याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. (Pune News)

"पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू"

खारघर (Kharghar News) परिसरातील दिघा ईलठणपाडा येथे रेल्वेच्या मालकीचा असलेल्या धरणात आपल्या 2 मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने शैलेश कुमार गुप्ता या 18 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला. सध्या अग्निशमन विभागाकडून शैलेशचा शोध घेण्यात येत असून अद्याप त्याचा मृतदेह सापडला नसल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

Mumbai: म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा, रोखण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3 हजारात दर्शन देणारी टोळी रडारवर

SCROLL FOR NEXT