Talathi Bharati 2023: तलाठी भरतीने सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! ४६४४ पदांसाठी तब्बल साडे बारा लाख अर्ज; 'इतक्या' कोटींची रक्कम जमा

Talathi Bharati Application: साडेबारा लाख उमेदवारांपैकी शुल्क भरलेले १० लाख ४२ हजार उमेदवार हे परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.
Talathi Bharati 2023:
Talathi Bharati 2023: Saamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Talathi Recruitment 2023: नुकतीच राज्यात तलाठी भरती सुरू होणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या घोषणेनंतर राज्यातील चार हजार ६४४ पदासाठी राज्यातून सुमारे साडेबारा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

त्यापैकी शुल्क भरलेले १० लाख ४२ हजार उमेदवार हे परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. पात्र उमेदवारांच्या परीक्षा शुल्कातून राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ९७ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

Talathi Bharati 2023:
Mumbai-Goa Highway: निवळी घाटात दरड कोसळली, मुंबई -गोवा महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात तलाठी भरतीच्या अर्ज प्रक्रियेला उत्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. लाखो विद्यार्थ्यांनी तलाठी भरती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. अर्जदार उमेदवारांच्या परीक्षा शुल्कातून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ९७ कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे.

तलाठी पदासाठी अर्ज भरण्याची मुदत २५ जुलै पर्यंत होती. तसेच याचा अर्ज भरण्यासाठी खुल्या गटासाठी एक हजार तर इतर गटासाठी ९०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. या प्रक्रियेत लाखो तरुणांनी अर्ज दाखल केल्याने सरकारी तिजोरीत चांगलीच धनवृष्टी झाली आहे.

Talathi Bharati 2023:
Almatti Dam Discharge Increased Today : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा, अलमट्टी धरणातून हाेणार दीड लाख क्यूसेकनं विसर्ग (पाहा व्हिडिओ)

दरम्यान, राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com