Shruti Vilas Kadam
रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्याने प्रत्येक व्यक्तीला त्रास होतोच असे नाही. अनेक लोकांना कोणतीही त्रास न होता कॉफी घेता येते.
कॉफीमुळे पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे संवेदनशील असलेल्या व्यक्तींना रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यावर जळजळ किंवा अस्वस्थपणा जाणवू शकते.
कॅफीनमुळे अन्ननलिका आणि पोटाला त्रास होतो. त्यामुळे पोटातील अॅसिड वर येऊन छातीत जळजळ किंवा आंबट ढेकर येतो.
रिकाम्या पोटी कॅफीन शरीरात वेगाने शोषले जाऊ शकते. त्यामुळे काही लोकांना अस्वस्थपणा, हात-पाय थरथरणे किंवा हृदयाची धडधड जाणवू शकते.
कॉफीमुळे आतड्यांची हालचाल वाढू शकते. त्यामुळे काही लोकांना कॉफी प्यायल्यानंतर लगेच टॉयलेटला जाण्याची इच्छा होते.
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने थेट अल्सर होतो, असे ठोस पुरावे नाहीत. मात्र आधीपासून अल्सर किंवा पोटाचा त्रास असल्यास कॉफीमुळे हा त्रास वाढू शकतात.
कॉफी प्यायल्यानंतर अॅसिडिटी होत असेल तर ती रिकाम्या पोटी कॉफी न घेता नाश्त्यासोबत किंवा नाश्त्यानंतर घेणे फायदेशीर ठरू शकते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.