पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्याहून फलटणला जाणाऱ्या बसमध्ये पहाटे साडेपाच वाजता या महिलेवर बलात्कार झाला. या घटनेमुळे एसटी बस डेपो सारख्या सार्वजनिक ठिकाणीही महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल केला जात आहे. याचदरम्यान पुण्यात महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार आणखी एक प्रकार समोर आला आहे.
पुण्यातल्या कल्याणीनगर परिसरात एका २० वर्षीय कॅब चालकाने महिला सॉफ्टवेअर इंजिनीयर महिलेची छेडछाड केली. कल्याणीनगर येथील एका कंपनीमध्ये ही महिला काम करते. तेथून तिने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली होती. संगमवाडी रोडवर बुक केलेली कॅब तिला घेण्यासाठी आली. दरम्यान कॅबमध्ये बसल्याने चालकाने या महिलेची छेडछाड केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॅबमध्ये बसल्यानंतर चालकाने रियर व्ह्यू मिरर फिरवला आणि महिलेकडे वळवला. आरशामध्ये महिलेकडे वाईट नजरेने पाहू लागला. त्याने महिलेशी छेडछाड केली. महिलेने कॅब अर्ध्या रस्त्यात थांबवण्यास चालकाला सांगितले. कॅबमधून उतरल्यानंतर पीडित महिलेने थेट पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय कॅबचालकाला अटक केली आहे. खडकी पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सुमित कुमार असे आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशातल्या उन्नाव येथील रहिवासी आहे. तो कामानिमित्त नुकताच पिंपरी-चिंचवडला राहायला आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.