Pimpri Chinchwad Firing  Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : राज्यात चाललंय काय? दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर गोळीबार, परिसर हादरला

Pimpri Chinchwad Firing : पिंपरीमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी : मुंबईच्या धारावीत महिलेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना पिंपरीमध्येही गोळीबाराची घटना घडली आहे. पिंपरीतील मार्केटमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराच्या घटनेने परिसर हादरून गेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाढलेल्या गोळीबाराच्या घटनेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पिंपरी मार्केटमध्ये गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात गुन्हेगारांनी दुचाकीवरून येऊन व्यापारावर गोळीबार झाला आहे. अज्ञात गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात व्यापारी जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी पोहोचली.

वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार

पिंपरी मार्केटमध्ये वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या किराणा दुकानदारावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराने आजूबाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीती पसरली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर लोकांची एकच धावाधाव झाली. काहींनी गोळीबाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तातडीने तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

भावेश कंकरानी असे वीस वर्षीय व्यापाऱ्याचे नाव आहे. भावेशवर गोळीबार करून गुन्हेगारांनी त्याच्या गळ्यातील सोन्याच्या ऐवज देखील पळवला. या गोळीबारात भावेश कंकरानी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र भरदिवसा बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. व्यापारी तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic Police : नंबर प्लेट गंजलेली, हेल्मेट नाही; ठाण्याच्या तरूणाने वाहतूक पोलिसाला विचारला जाब, व्हिडिओ व्हायरल

Breathing Problems: रात्री झोपताना श्वास घ्यायला त्रास होतोय अन् वजनही वाढतंय? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

How To Remove Negativity: घरात दारिद्र्य आणतात या ४ गोष्टी, आजच घराबाहेर काढा

Maharashtra Cabinet : सांगली, लातूर अन् पुण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, निवडणुकीआधी कोट्यवधी रूपये मंजूर

SCROLL FOR NEXT