pune estate agent murder Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : मेहुणीसोबत अनैतिक संबंध, घरच्यांचा विरोध, रात्री एकठ्यात धरलं; पुण्यात इस्टेट एजंटला संपवलं

Pune Murder News : खून करणारे आरोपी हे काका पुतण्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या एका इस्टेट एजंटचा दोन नराधमांनी खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी ९ मे रोजी रात्री पुण्यातील गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे घडली आहे. हत्या झालेला व्यक्ती हा घरी जात असताना आरोपींनी त्याला रस्त्यात गाठून त्याचा खून केला. खून करणारे आरोपी हे काका पुतण्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मृत इस्टेट एजंटचं नाव मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज) असल्याची माहिती आहे. या प्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२) आणि केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघेही रा. खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेहुणीचे आरोपी रोहित बरोबर अनैतिक संबंध होते. रोहित हा पूर्वी रिक्षा चालवायचा, नंतर त्याने टूरिस्टचा व्यवसाय सुरु केला होता. मनोहर यांचा दोघांच्याही अनैतिक संबंधांना विरोध होता. यामुळे त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री रोहितने त्याच्या दोन तीन मित्रांना घेऊन मनोहर यांना रस्त्यात गाठलं.

तेथे ज्ञानदा अपार्टमेंटच्या समोर आधी त्यांना लाथा-बुक्क्यांनी आणि बांबूने मारहाण करण्यात आली. बांबूचा वार डोक्यावर वर्मी लागल्याने मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींच्या मागावर दोन पथके रवाना केली. यातील मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून तर केशवला बीड येथील गेवराईमधून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

SCROLL FOR NEXT