Major Drug Bust in Pune Saam
मुंबई/पुणे

पुण्यात चाललंय काय? गुंगीकारक औषधांची सर्रास विक्री; उत्तर प्रदेशचं कनेक्शन उघड

Major Drug Bust in Pune: नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल सात हजार गुंगीकारक गोळ्या पुणे पोलिसांकडून जप्त. तसेच दोन आरोपींनाही केली अटक.

Bhagyashree Kamble, Akshay Badve

  • गुंगीकारक औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक

  • पुणे शहरातील विविध परिसरात करत होते विक्री

  • उत्तर प्रदेश येथून कुरिअरमार्फत औषधी गोळ्या पुण्यात मागवत होते

  • पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एका धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ७ हजार गुंगीकारक गोळ्या पुणे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच गुंगीकारक औषधी गोळ्यांती विक्री करणाऱ्या २ व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंगीकारक औषधी गोळ्यांची विक्री विविध परिसरात केली जात होती. या गोळ्या उत्तर प्रदेशातून कुरिअरमार्फत पु्ण्यात मागवण्यात येत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना गोपनीय याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात एका दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना अडवलं.

पुणे पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तसेच झडती घेतली असता ते दिघोही गुंगीच्या औषधांची विक्री करत असल्याचं आढळून आलं. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये तसेच कोंढवा येथील राहत्या घरात NITRAZEPAM TABLET IP NITZASCEN-10, Alprazolam Tablet I.P 0.5 mg, ALPRASCEN-0.5, NITRAZEPAM TABLET IP NITRAFAST-10 या अंमली पदार्थाच्या एकूण ६९०० गोळ्या सापडल्या.

पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून अंमली पदार्थांच्या गोळ्या, दुचाकी असा एकूण दिड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. समीर हमीद शेख (वय ४०) आणि सुनिल गजानन शर्मा (वय ३४) असे आरोपींचे नावे आहेत. त्यांच्यावर गुंगीकारक औषधी गोळ्या विनापरवाना आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रीपशनशिवाय बाळगणे. तसेच खरेदी विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणाहून औषधसाठा मागवत असल्याचे व कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा परीसरात नशेसाठी गोळ्या विक्री करत असल्याचे दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Session: भारतातील मोठ्या विमानतळावर सायबर अटॅक; विमानांचा डेटा लीक करण्याचा प्रयत्न

इन्फ्लूएन्सरचा '१९ मिनिटांचा' MMS व्हिडिओ लीक; तरूणीनं आणखी एक VIDEO केला शेअर, म्हणाली २ तरूणांनी..

Prajakta Gaikwad: मुहुर्त वेळा आली...; प्राजक्ताच्या हाती सजला हिरवा चुडा, थाटामाटात होणार उद्या लग्न!

Creamy Spinach Pasta: नाश्त्याला उपमा, पोहे खाऊन कंटाळलात? झटपट बनवा क्रिमी पालक पास्ता, वाचा सोपी रेसिपी

'मला धोका दिला'; हॉस्टेलमध्ये केली बायकोची हत्या, नंतर नवऱ्याचे WhatsApp स्टेट्स पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT