Maval NCP Sarpanch Murder News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाची भर रस्त्यात निर्घृण हत्या; मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना

Maval Sarpanch Murder News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे

Satish Daud

दिलीप कांबळे, साम टीव्ही

Maval NCP Sarpanch Murder News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. तालुक्यातील प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचावर अज्ञात आरोपींनी कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरपंचाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी  (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण गोपाळे असं हत्या झालेल्या सरपंचाच नाव आहे. शनिवारी (१ एप्रिल) रात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जमिनीच्या प्लॉटिंगच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा शिरगाव पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गोपाळे हे शिरगाव (Pune News) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ते शिरगाव मधील साईबाबा मंदिरासमोर उभे असताना अचानक तीन अज्ञात आरोपी हातात कोयता घेऊन आले.

काही कळण्याच्या आतच या तीन आरोपींनी (Crime News) हातातील कोयत्याने सरपंच प्रवीण गोपाळे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील लोक येत असल्याचं पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

या हल्ल्यानंतर गोपाळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या सरपंच प्रवीण गोपाळे यांना तातडीने उपचारासाठी सोमटाने फाटा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, चेहऱ्यावर आणि छातीवर कोयत्याचे गंभीर वार असल्याने उपचारापूर्वीच प्रवीण गोपाळे यांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Ranking: दो भाई, दोनो तबाही! ICC वनडे रँकिंग पाहून रोहितच्या चाहत्यांना धडकी भरेल

BP Control Tips: थंडीत बीपी वाढतोय? नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये १९ लाखांचा पानमसाला- साठा जप्त FDA ची धडक छापेमारी

CCTV : भाजपकडून बंद खोलीत ४.३० तास बसून मतदार यादीत फेरफार, काँग्रेस नेत्याने पुरावाचे दाखवले

Indrayani River: इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, कारण धक्कादायक, VIDEO

SCROLL FOR NEXT