Pune Police  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणारी टोळी गजागाड; ६ जिल्ह्यांतील १० गुन्हे उघडकीस

Crime News Update: टॉवर कंपनीच्या ३ अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे उघडकीस आले आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात रोज खून, कोयता गँगच्या दहशतीच्या बातम्या समोर येत असतानाच आता नवीनच प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी चक्क मोबाईल टॉवर चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pune Latest Marathi News Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात (Pune) चक्क मोबाईल टॉवर चोरणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बंद अवस्थेतील मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून १३ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

तसेच राज्यभरातील सहा जिल्ह्यात दहा मोबाईल टॉवरचे साहित्य चोरल्याचेही या टोळीकडून कबूल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये टॉवर कंपनीच्या ३ अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे उघडकीस आले आहे. (Latest Marathi News)

या टोळीकडून सातारा, बीड, सांगली, पुणे, रायगड, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील १० मोबाईल टॉवरचे साहित्य चोरल्याचे कबुल केले आहे. जी. टी. एल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे देशभरात असंख्य टॉवर आहेत. २००८ मध्ये कंपनी बंद झाल्यानंतर या टोळीने बनावट लेटरपॅड दाखवून चोरी करण्यास सुरूवात केली होती. (Pune Crime)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : प्रसिद्ध गायक शस्त्रक्रियेदरम्यान गाणे गाताना दिसला; VIDEO होतोय तुफान व्हायरल, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवल्यासाठी दिल्या जाणार

Stray Dog : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची भयंकर दहशत, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत १३० जणांचा घेतला चावा

High cholesterol symptoms: पायांमध्ये ही 6 लक्षणं दिसतायत? हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्याचे शरीर देतंय संकेत

राजकारणात नवं काही शिजतंय? सुप्रिया सुळेंसह ८ खासदार घेणार पंतप्रधान मोदींची भेट

SCROLL FOR NEXT