Pune Crime News:  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News: घरासमोर दुचाकीचा जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरूने घरमालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Pune Crime News:

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर दुचाकीचा जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरूने घरमालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड झाली, त्यानंतर भडकलेल्या भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाडेकरूने मालकाची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेनंतर पुण्याच्या हडपसरमधील उरुळी देवाची परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दादा ज्ञानदेव घुले असे हत्या झालेल्या घरमालकाचे नाव आहे. तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी संतोष राजेंद्र धोत्रे या संशयितास अटक केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोत्रे हा घुले यांच्या चाळीत भाडेकरू आहे. सोमवारी दुपारी धोत्रे दारू प्यायल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी घुले यांनी घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवला. त्यामुळे झोपमोड झाल्याने धोत्रेने दादा ज्ञानदेव घुले यांना मारहाण केली. त्यानंतर धोत्रेने पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत बुडवून घुले यांची हत्या केली.

घुले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलीस चौकशीदरम्यान घुले आणि धोत्रे यांच्यात सोमवारी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना दादा ज्ञानदेव घुले यांचा मृतदेह आढळला. पोलीस तपासात पुढे दादा ज्ञानदेव घुले यांची हत्या झाल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुसऱ्यांच्या घरी पितरांचे जेवण करणं शुभ की अशुभ? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना हटवा नाहीतर... काँग्रेस आता थेट 'आरपारच्या' भूमिकेत; बघा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा बिगुल वाजलं

Weather Update : राज्यात उकाडा वाढला! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे थरार! मिसिंग लिंकवर २ भीषण अपघात; रस्त्यावर लागला केळींचा ढीग

SCROLL FOR NEXT