Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO : पुणे हादरले! ३ तरुणांसह महिलेचं अपहरण करून बेदम मारहाण, व्हिडिओ बघून प्रचंड चीड येईल

Pune Crime News: पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील ३ तरुणांसह एका महिलेला काही अज्ञात लोकांकडून अपहरण करण्यात आले होते. अज्ञातस्थळी नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये अपहरण करून ३ तरुणांसह एका महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमध्ये (Pune Shikrapur) ही घटना घडली आहे. चौघांनाही हात-पाय बांधून, लाथा-बुक्क्यांनी आणि कोयत्याने जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. तरी देखील पोलिसांकडून (Pune Police) अद्याप कारवाई करण्यात आली नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील ३ तरुणांसह एका महिलेला काही अज्ञात लोकांकडून अपहरण करण्यात आले होते. कारमधून अज्ञातस्थळी घेऊन जाऊन या चौघांनाही लाठ्याकाठ्या, कोयता, तलवारीसह हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे जिल्हा हादरला आहे. चार ते पाच तरुण एका तरुणाला जबर मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मारहाण करू नये यासाठी तो विनंती करत आहे तरी देखील त्याला जमिनीवर लोळेपर्यंत मारहाण केली जात असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचे हात-पाय बांधल्याचे दिसत आहे. त्याचे पाय खिडकिला बांधले आहेत. त्याला देखील बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ पाहून पुणेकर संताप व्यक्त करत आहेत. या चौघांना का मारहाण करण्यात आली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.

महत्वाचे म्हणजे ही घटना होऊन दोन दिवस झाले तरी देखील अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. तसंच पोलिस याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. अशामध्ये पुणे ग्रामीण पोलिस नेमकी काय कारवाई करतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

Panchang Today: आज कुंभ राशीत चंद्र, निर्णयांसाठी अनुकूल दिवस; पाहा आजचे मुहूर्त आणि लकी राशी

SCROLL FOR NEXT