Pune Crime News Saam t
मुंबई/पुणे

Pune Crime News: आता काय म्हणावं? मटणावरून वाद टोकाला; पतीने पत्नीच्या डोक्यात मारला मासे कापण्याचा कोयता

Pune Crime News: पुण्यातील येरवड्यामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने पत्नीचे डोक्यात मासे कापण्याचा कोयत्याने जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव

Pune News: कौटुंबीक कारणावरून पती-पत्नी यांच्यात वाद होत असतात. अनेकदा असे वाद टोकाला जातात. असाच धक्कादायक प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात घडला आहे. पुण्यातील येरवड्यामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने पत्नीचे डोक्यात मासे कापण्याचा कोयत्याने जखमी केल्याचा प्रकार धक्कादायक समोर आला आहे. (Latest Marathi News)

कौटुंबीक कारणावरुन पती-पत्नी यांच्यात वाद होत असल्याचे प्रकार अनेकदा पाहावयास मिळतात. परंतु पुण्यातील येरवडा परिसरातील सुभाषनगर येथेही असाच प्रकार समोर आला आहे.

एका कुटुंबात मद्य पिऊन घरी आलेला पती घरात पत्नीशी जेवणासाठी मटण बनवले नसल्यावरून भांडला. त्यानंतर पतीने रागातून पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याच्या कोयत्याने मारुन तिला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार केला.

याप्रकरणी पत्नीने पती विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.संदीप विष्णू मोरे (वय ३३) असे आरोपीचे नाव आहे. संदीपला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

याबाबत २९ वर्षीय पत्नीने त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार २८ मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. संबंधित वेळी आराेपी संदीप माेरे हा घरी दारु पिऊन आला.

त्यानंतर त्याने पत्नीला जेवणासाठी मटण का बनवले नाही अशी विचारणा केली. त्यानंतर पत्नीसह स्वत:चे आईवडीलांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याच्या कोयत्याने मारुन तिला जखमी केले आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? पगार कितीने वाढणार? वाचा सविस्तर

Weekly Horoscope: कौटुंबिक समस्यांवर तोडगा निघेल, आर्थिक उलाढाली होतील; पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू

Fasting Recipes : एक रताळे अन् दाण्याचा कूट, उपवासाला झटपट बनवा 'हा' हेल्दी पदार्थ

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार

SCROLL FOR NEXT