Cyber Crime News: सायबर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar News: दोन धर्माच्या भावना दुखावतील अशा पोस्ट करणाऱ्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Cyber Crime News
Cyber Crime NewsSaam Tv
Published On

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News Today: दोन धर्माच्या भावना दुखावतील अशा पोस्ट करणाऱ्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार गोकुळ आसाराम कुतरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Cyber Crime News
Nanded Accident: लग्न सोहळा आटोपून दुचाकीने घरी निघाले; पण वाटेतच मृत्युने गाठलं, भावासमोरच झाला अंत

सोशल मीडियावर (Social Media) प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी केलेल्या जय श्रीराम या कमेंटला दुसऱ्या समाजाच्या एका व्यक्तीने हिंदू धर्माच्या भावनात दुखावतील अशी कमेंट केल्याचे दिसून आले.

या पोस्टमध्ये हिंदू समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केलेली दिसून आली. तसेच दुसऱ्या एका प्रोफाइल धारकाने हिंदू धर्माच्या भावनात दुखवणाऱ्या या कमेंटला सोशल मीडियावर प्रसारित करून दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (Crime News)

Cyber Crime News
Bhayandar Marriage News: नवरदेव मंडपात वाट पाहत उभा, नवरी अचानक लिफ्टमध्ये अडकली अन्.... भाईंदरमधील थरारक घटना

अशा प्रकारच्या पोस्ट टाकून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल आणि जनमाणसात संभ्रम निर्माण होऊन कायदा, सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न आणि जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा उद्देश कमेंट करणाऱ्याचा होता, असे आढळून आले.

त्यामुळे पोलीस (Police) अंमालदार कुतरवाडे यांनी याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात प्रोफाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा सायबर पोलीस निरीक्षक प्रविणा यादव हे पुढील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com