
संजय सुर्यवंशी
Accident News: नांदेडयेथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. सदर व्यक्ती आपल्या भावासह शेजारील गावात लग्नासाठी आले होते. ओळखीच्या व्यक्तीच्या लग्नात उपस्थित राहून त्यांनी नवविवाहीत जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. अन् भावासह दुचाकीवरून घरी परतत असताना वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. (Latest Accident News)
मारोती सोमठाने असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर भाऊ मारोती पप्पुलवार हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लग्नावरून घरी परतताना लग्नातील गप्पा गोष्टी करत हे दोघे घरी परतत होते.
नांदेडच्या (Nanded) धर्माबाद - येताळा रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. धर्माबाद तालुक्यातील विळेगाव येथील लग्न समारंभ आटोपून परत आपल्या गावाकडे जात असताना हा अपघात घडला.
नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील वळणावर मुंबईच्या दिशेने बटाटे घेऊन जाणारा ट्रकच्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला आहे. पलटी झालेल्या ट्रक खाली ड्रायव्हर आणि क्लिनर अडकुन जखमी झालेत. ट्रक खाली अडकलेल्या ड्रायव्हर आणि क्लिनरला महामार्ग पोलिस केंद्र घोटी, कसारा पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन टीमच्या कर्मचाऱ्यांनी 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. या दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात ग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला आहे.
तळेगावच्या लिंबू फाट्यावर दूचाकीला अपघात,चार जखमी
जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर एका दुचाकीचा भीषण अपघात झालाय. यात चार जण जखमी झाले आहेत.जुना पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यावरून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने भरधाव वेगात एक दुचाकी जात होती. तितक्यात विरुद्ध दिशेने तळेगाव शहराकडे जाणाऱ्या एका तीन चाकी टेम्पोला दुचाकीची जोरात धडक बसली.
या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून अन्य तिघेजण या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर टेम्पो न थांबता घटनास्थळावरून पसार झाले. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय. तळेगाव दाभाडे पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टेम्पो चालकाचा शोध घेत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.