Pune Crime News : DJच्या आवाजाची तक्रार करणाऱ्या वृद्धाला शेजाऱ्यांकडून मारहाण, अपमान सहन न झाल्याने जीवनच संपवलं

Pune Crime News : ज्ञानेश्वर साळुंखे असं 70 वर्षीय पीडित व्यक्तीचे नाव आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

अक्षय बडवे

Pune News : शेजाऱ्यांकडून झालेली मारहाण आणि अपमानाला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा भागातील धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

ज्ञानेश्वर साळुंखे असं 70 वर्षीय पीडित व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मुलगा पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चेतन बेले, देवेश ऊर्फ नन्या पवार, यश मोहिते, शाहरुख खान, जय तानाजी भडकुंभे या 5 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन बेले हा फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी राहायला आहे. नवी खडकी परिसरात 28 मे रोजी आरोपीच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याने डीजे स्पीकर लावला होता. स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा, आम्हाला त्रास होतो असे सांगितले. यावरून आरोपींनी त्यांचा अपमान केला आणि त्यांना हाकलून दिलं.

Pune Crime News
Pune Load Shedding News : उकाड्यात पुणेकरांना लोड शेडिंगचा झटका? या भागात वीजपुरवठा 1-2 तास बंद राहण्याची शक्यता

मात्र त्रास होत असल्याने साळुंखे त्याठिकाणी पुन्हा गेले आणि आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. (Latest News Update)

Pune Crime News
Kandivali Firing Update: कांदिवली लालजीपाड्यात गोळीबार करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक, हत्येमागचं धक्कादायक कारण उघड

याप्रकरणी फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी यांनी पुन्हा फिर्यादीचे वडील ज्ञानेश्वर साळुंखे यांना मारहाण केली. मारहाणीमुळे होणार्‍या वेदना व अपमान सहन न झाल्याने त्यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांना पाच जणांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com