Pune Load Shedding News : उकाड्यात पुणेकरांना लोड शेडिंगचा झटका? या भागात वीजपुरवठा 1-2 तास बंद राहण्याची शक्यता

Pune Electricity News: विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला आहे.
Electricity
Electricity Saam Tv

अक्षय बडवे

Pune News: वाढती उष्णता आणि उकाड्यामुळे हैरान नागरिक पावसाची प्रतीक्षा करत आहेत. राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना भयंकर गर्मीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे ही स्थिती असताना पुणेकरांना या उकाड्यात लोड शेडिंगचा सामना करावा लागू शकतो.

वाढत्या विजेच्या मागणीमुळे पुण्यात 1 ते 2 तास लोड शेडिंग केली जाण्याची शक्यता आहे. विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला आहे.

Electricity
Nashik Accident News : नांदगाव-मालेगाव मार्गावर कार पुलावरुन थेट नदीत कोसळली; लहान बाळासह 3 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

यामुळे लोणीकंद उपकेंद्र अतिभारित होण्याचा व संपूर्ण उपकेंद्र बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी महापारेषणच्या काही १३२ व २२० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचा विचार आहे. (Latest Political News)

Electricity
Pradeep Kurulkar News: डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

या भागात लोड शेडिंगची शक्यता

पुणे शहरातील नगररोड, खराडी, लोहगाव, वडगाव शेरी, येरवडा आदींसह चिंचवड गाव, भोसरी एमआयडीसी व गावठाण, दिघी, लोणीकंद, थेऊर, उरळीकांचन आणि चाकणमधील काही भागात सोमवारी दुपारी एक ते दोन तासांसाठी विजेचे भारनियमन केले जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com