Pune Women Police Crime Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न; विश्रांतवाडी परिसरातील खळबळजनक घटना

Pune Women Police Crime : चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात घडली.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

चारित्र्यावर संशय घेत पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात घडली. याप्रकरणी महिला पोलिसाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल होताच त्याला अटकही करण्यात आली आहे. हर्षद विकास पानसरे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या पुणे शहरातील पोलीस (Pune Police) दलात कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या चारित्र्यावर पती हर्षद हा संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास हर्षद आणि त्यांच्यात शनिवारी वाद झाला. यावेळी आरोपी हर्षद याने पत्नीचा गळा आणि तोंड दाबून खून करण्याचा प्रयत्न केला.

इतकंच नाही, तर त्याने पत्नीला अमानूष मारहाण (Crime News) देखील केली. तसेच, सोशल मीडियावर बदनामीकारक संदेश पाठविण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकारानंतर पत्नीने पोलिसांत धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रिलसाठी तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून पेटवली; सेकंदातच स्फोट झाला, संपूर्ण जबडा फाटला

Gurukul Monitor POCSO Case: भयंकर! विद्यार्थ्याचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल; गुरुकुलात धक्कादायक प्रकार|VIDEO

Vande Bharat Train: रेल्वेचा कोच की हॉटेलचा रुम! वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Pune News : एवढी मुजोरी! बस चालकाकडून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीत लाडक्या बहिणींसह उत्साहात साजरी केली भाऊबीज

SCROLL FOR NEXT