Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: फुकट दारुसाठी दादागिरी, मद्यधुंद एक्साइज अधिकाऱ्याकडून हॉटेल मॅनेजरसह वेटरला मारहाण

Pune latest News: या अधिकाऱ्याने हॉटेल बंद असतानाही दारूची मागणी केली आणि देण्यास नकार दिल्याने मालकासह वेटरला मारहाण केली.

Gangappa Pujari

Pune Crime News:

फुकट दारुची मागणी करत एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने हॉटेलमध्ये धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामधून समोर आला आहे. विकास अबने असे या अधिकाऱ्याचे नाव असून या अधिकाऱ्याने हॉटेल मॅनेजर आणि वेटरला मारहाणही केल्याचे समोर आले आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील (Pune) ड्रामा नाईन हॉटेलमध्ये एका एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने दारुसाठी धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या अधिकाऱ्याने हॉटेल बंद असतानाही दारूची मागणी केली.

मात्र दारु देण्यास नकार दिल्याने या अधिकाऱ्याने हॉटेल मॅनेजर आणि वेटरला बेदम मारहाण करत हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे याच अधिकाऱ्याने हॉटेल बाहेर एका जोडप्याला मारहाण केल्याचेही उघड झाले आहे. याविषयी पोलिसांना कोणतीही माहिती नसल्याने संताप व्यक्त केला जात असून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Christmas Celebration : भारतात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं; बॉयफ्रेंडला अटक

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

Cracking knuckles: हाताची बोटं कटकट मोडण्याची सवय आहे; संधिवात होऊ शकतो? डॉक्टरांनी काय सांगितलं? वर्षानुवर्षे मनात असलेला गैरसमज होईल दूर

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रुपसिंग नाईक यांचे निधन...

SCROLL FOR NEXT