sunil Tatkare-Bharat Gogawale
sunil Tatkare-Bharat GogawaleSaam TV

Political News : पक्के राजकीय वैरी बनले सख्खे मित्र? भर कार्यक्रमात सुनील तटकरे-भरत गोगावलेंनी गाजवला मंत्रिपदाचा मुद्दा

Bharat Gogawale-Sunil Tatkare : गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍मारक सभागृहाच्‍या कामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला दोघे एकत्र दिसले.
Published on

सचिन कदम

Mumbai News :

राज्यातील बदलेल्या राजकारणामुळे स्थानिक राजकारणावरही प्रभाव पडला आहे. अनेक ठिकाणी पक्के राजकीय वैरी एकत्र काम करु लागले आहेत. रायगडमध्येही तीच स्थिती निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत वेगळा गट स्थापन करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे रायगडमधील बड्या नेत्यांनाही एकत्र काम करावं लागणार आहे.  (Latest Marathi News)

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष आणि खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्‍यात मनोमिलन झालं आहे. रायगडमधील दोघेही विरोधक रविवारी पहिल्‍यांदाच एकाच व्‍यासपीठावर आले. गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍मारक सभागृहाच्‍या कामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला दोघे एकत्र दिसले. (Political News)

sunil Tatkare-Bharat Gogawale
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंकडून पक्ष विस्ताराला सुरुवात; ६ बड्या नेत्यांकडे सोपवली महत्वाची जबाबदारी

यावेळी झालेल्या भाषणात भरत गोगावले यांच्या मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शाब्दिक टोलेबाजी करत दोघांनी एकमेकांना चिमटे काढले. खासदार तटकरे यांच्या दिल्ली वारीचे उदाहरण देत आदिती तटकरे मंत्री झाल्‍या, आमचा काही नंबर लागत नाही. आम्‍ही मंत्री कधी होणार ते आता तटकरे साहेबच सांगतील, असं भरत गोगावले यांनी म्हटलं.

नवरात्रीचे दिवस आले आहेत शपथविधी जवळ आला असेल. मला वाटलं भरतशेठ जॅकेट घालून आले असतील. आमच्‍या तुम्‍हाला शुभेच्‍छा आहेतच. विरोधात होतो तेव्‍हाही शुभेच्‍छा होत्‍या. ज्‍याच्‍या नशिबात जे आहे आहे ते मिळणारच आहे, असं खासदार सुनील तटकरे यांनी गोगावले यांना प्रत्युत्तर दिलं. खासदार-आमदारांच्या या शेरेबाजीमुळे उपस्थितांमध्‍ये चांगलाच हाशा पिकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com