Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : धक्कादायक! काजूकतली फुकट दिली नाही म्हणून स्वीट मॉलमध्ये गोळीबार; आरोपी अटकेत

याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune Crime - पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काजूकतली फुकट दिली नाही म्हणून स्वीट मॉलमध्ये गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका आरोपीला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत फुलपरी स्वीट मॉल आहे.सोमवारी या दुकानात दोन तरुण आले त्यांनी एक किलो काजू कतली घेतली मात्र दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या तरुणांनी त्या दुकानदारावर गावठी पिस्तूल रोखून गोळी मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र गोळी बाहेर आली नाही. त्यानंतर त्या तरुणांनी पुन्हा पिस्तूल नीट तपासून गोळी झाडली. मात्र गोळी दुकानातच पडली. या सर्व गोंधळात त्या ठिकाणी गर्दी जमल्याचे पाहून आरोपींनी धूम ठोकली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाससह एका आरोपीला सिहगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local News : हार्बर रेल्वे मार्गावर लोकलखाली येऊन तरुणाचा मृत्यू; लोकल वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पावसाळ्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागातील रस्त्यांची दुरावस्था

Yawatmal : कापूस पिकं उद्ध्वस्त, शेतकऱ्याला अश्रू अनावर |VIDEO

TVS Ev Smartwatch: स्कूटरची चार्जिंग संपली, टायर पंक्चर झालाय? तुम्हाला झटक्यात कळलेल; TVS ईव्ही स्मार्टवॉच लाँच, किंमत किती?

Airport Jobs 2025: फ्रेशर्ससाठी खुशखबर! एअरपोर्टवर भरती सुरु; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारिख

SCROLL FOR NEXT