DRDO Espionage Case
DRDO Espionage Case Saam TV
मुंबई/पुणे

DRDO Espionage Case: डॉ. प्रदीप कुरूलकरसह एअरफोर्स अधिकारीही पाक गुप्तचरांच्या संपर्कात; एटीएसचा मोठा दावा

Satish Daud-Patil

DRDO Espionage Case: भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याप्रकरणी सुरू असलेल्या ATS तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पुण्यातील विशेष एटीएस न्यायालयाने उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आज या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यासह भारतीय हवाई दलाचा एक अधिकारीदेखील पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. निखील शेंडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. निखील शेंडे हे बंगळुरूमध्ये कार्यरत आहेत.

पाकिस्तानातील ज्या आयपी अॅड्रेसवरुन डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात येत होता, त्याच आयपी अॅड्रेसचा उपयोग निखिल शेंडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येत होता अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे.

निखिल शेंडे यांचा याबाबतीत एटीएसने (ATS) जबाब नोंद केला असून एअर फोर्सकडून देखील चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी यंत्रणा कुरुलकरच्या माध्यमातून इतर अधिकाऱ्यांनादेखील 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न झाले का, इतर कोणते अधिकारी या कटात अडकले, याचाही तपास सुरू आहे.  (Breaking Marathi News)

डीआरडीओचे अधिकारी असलेले आरोपी प्रदीप कुरुलकरकडून चार मोबाईल फोनचा वापर सुरू होता. त्यापैकी एका मोबाईलचे लॉक उघडले जात नव्हते. फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तो मोबाईल दिल्यानंतर देखील तो उघडण्यात अपयश येत होतं. अखेर कुरुलकरने आज स्वतः तो मोबाईल सुरू करुन दिला. या मोबाईलमधे जो डाटा सापडला आहे, त्याचा तपास ए टी एस कडून करण्यात येणार आहे.

प्रकरण काय आहे?

महाराष्ट्र एटीएसच्या पुणे युनिटने गेल्या आठवड्यात शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ते हनीट्रॅपमध्ये अडकले असल्याचे महाराष्ट्र एटीएसच्या तपासात उघड झाले आहे की, कुरुलकर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होते, परंतु तिला कधीही भेटले नाहीत.

पण ते डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटत असत. दरम्यान एटीएसला कुरुलकर आणि पाकिस्तानी गुप्तहेर यांच्या अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स मिळाल्या आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT