Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: हृदयद्रावक! आधी फासावर लटकवलं, नंतर श्वानावर गोळ्या झाडल्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Dog Shot While Hanging From Rope: पिरंगुटमध्ये एका तरुणाने आपल्या पाळीव श्वानाला फासावर लटकावून त्याला जीवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये श्वानाला फासावल लटकवत त्याच्यावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या पिरंगुट परिसरात हा प्रकार घडला आहे. मालकानेच आपल्या पाळीव श्वानाची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्वान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिरंगुटमध्ये एका तरुणाने आपल्या पाळीव श्वानाला फासावर लटकावून त्याला जीवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात श्वान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिरंगुट परिसरात राहणाऱ्या या तरुणाने आपल्या पाळीव श्वानाला फासावर लटकावल्याचा प्रकार मंगळवारी समाज माध्यमातून प्रसारित झाला. या प्रकारामुळे नागरिकांकडून प्रचंड संताप आणि राग व्यक्त केला जात आहे.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी श्वान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान पिसाळल्याचा दावा त्याच्या मालकाने केला आहे. त्यामुळेच त्याने त्याची हत्या केली असल्याचे सांगितले आहे. परंतु त्यामध्ये तथ्य वाटत नाही. मृत श्वानाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पौड पोलिसांनी आरोपी श्वान मालकाला ताब्यात घेतले असून कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT