Pune Traffic Changes : दिवाळीत पुण्यातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Pune Diwali Celebration: दिवाळीसाठी शॉपिंग करण्यासाठी याठिकाणी मोठ्यासंख्येने पुणेकर गर्दी करतात. ही गर्दी लक्षात घेता पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
Pune Traffic Changes : दिवाळीत पुण्यातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते? वाचा
Pune Traffic Changes newsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये दिवाळी शॉपिंगसाठी चारचाकी वाहन नेत असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. दिवाळीमध्ये पुण्यातील वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांकडून चारचाकी वाहनांना शिवाजी रोडने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाजी रोडजवळ पुण्यातील मोठ्या बाजार पेठा आहेत. दिवाळीसाठी शॉपिंग करण्यासाठी याठिकाणी मोठ्यासंख्येने पुणेकर गर्दी करतात. ही गर्दी लक्षात घेता पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.

रविवार पेठ, मंडई, बोहरी आळी, लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोड यासारख्या बाजारपेठेत मोठी गर्दी होते. ५ नोव्हेंबरपर्यंत पुण्यातील शिवाजी रोड बंद राहणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीमध्ये केलेल्या बदलांची माहिती नागरिकांना दिली आहे. त्यांनी पर्यायी मार्ग देखील सांगितले आहे. त्यामुळे पुणेकरांनी ५ नोव्हेंबरपर्यंत याच पर्यायी मार्गांचा वापर करायचा आहे.

Pune Traffic Changes : दिवाळीत पुण्यातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते? वाचा
Pune News: पुण्यात सापडलं मोठं घबाड! निवडणूक रणधुमाळीत अंदाजे ५ कोटींची रोकड जप्त केल्यानं खळबळ

असे आहेत पुण्यातील रस्त्यांवरील वाहतुकीत बदल -

- शिवाजीनगरवरुन शिवाजी रोडने जाणारी चारचाकी वाहने स.गो. बर्वे चौकामधून वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग - जंगली महाराज रोडने, टिळक चौकातून इच्छित स्थळी.

- अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग - बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी.

- शनिपार चौकाकडून मंडईकडे जाणारी वाहतूक आणि कुमठेकर रोडवरुन मंडईकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग - बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी

Pune Traffic Changes : दिवाळीत पुण्यातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते? वाचा
Pune Metro : मध्यरात्री मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्याला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com