Bishnoi Gang Threat: बिश्नोई गँगच्या नावाने पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकी, मागितली १५ कोटींची खंडणी

Bishnoi Gang Ransom Threat: बिश्नोई गँगच्या नावाने एका सराफ व्यावसायिकाला खंडणीची धमकी आलीय. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
Bishnoi Gang Threat: बिश्नोई गँगच्या नावाने  पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकी, मागितली १५ कोटींची खंडणी
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

बिश्नोई गँगने देशभरात दहशत माजवलीय. खंडणी आणि हत्येचे गुन्हे या गँगकडून केले जात असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. आता हाती आलेल्या बातमीनुसार, या गॅगच्या नावाने पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकी आलीय. ईमेलद्वारे व्यवसायिकाकडे १५ कोटी रुपयांची खंडणी मागितलीय.

हा मेल निनावी असून लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून ही खंडणी मागण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. फसवणूक करण्यासाठी बिश्नोई गँगचा उल्लेख या मेलमध्ये केला आहे. दरम्यान बिश्नोई गँगचे नाव वापरून काहीजणं खोडसाळपणा करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय, परंतु या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पुणे पोलिसांकडून या मेलचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. खरचं हा मेल बिश्नोई गँग कडून आला आहे का याचा तपास सुरू आहे.

फेसबूकवरून जिवे मारण्याची धमकी

पुण्यात अजून अशीच एक घटना घडलीय. बिश्नोई गँगच्या नावाने एकान व्यक्तीने एका जिवे मारण्याची धमकी दिली होती. या बिश्नोई गँगच्या नावाने जिवे मारण्याची धमकी आल्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लागलीच तपास सुरू केला. मात्र या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला. दोन तरुणामध्ये भांडण झालं होतं. त्यातून एकाने फेसबूकवरून बिश्नोई गँगच्या नावाने मित्राला जिवे मारण्याची धमकी दिली. बिश्नोई गँगचे नाव वापरून फेसबुकवरून धमकी देणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हा तरुण फेसबुकवर एका व्यक्तीला आपण बिश्नोई गँगचा मेंबर असल्याचं सांगून धमकावत होता. फेसबुकवर एका पेजखाली कमेंट सेक्शनमध्ये दोघांमध्ये संभाषण सुरू होतं. त्यातून त्याने धमकी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com