Pune Crime News Doctor Killed Wife and two son and ended her life in daund taluka shocking incident Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: भयंकर! आधी पत्नीचा गळा आवळला, नंतर दोन मुलांना विहिरीत फेकलं; पुण्यातील डॉक्टरने अख्खं कुटुंबच संपवलं

Daund Taluka Doctor News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. येथील एका डॉक्टरने पत्नी आणि आपल्या दोन पोटच्या मुलांची हत्या केली. त्यानंतर स्वत:लाही संपवलं

मंगेश कचरे

Pune Daund Taluka Doctor News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून (Daund Taluka) एक भयानक घटना समोर आली आहे. वरवंड येथील एका डॉक्टरने पत्नी आणि आपल्या दोन पोटच्या मुलांची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉ अतुल शिवाजी दिवेकर, पत्नी-पल्लवी-अतुल दिवेकर, वेदांतीका (मुलगी),अदत्विक (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. दौंड येथील चैताली पार्क परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना (Police) घटनास्थळी आढळून आलेल्या चिठ्ठीच्या अनुषंगाने प्रथमदर्शी एकाने पत्नी व दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अतुल शिवाजी दिवेकर वरवंड येथील चैताली पार्क येथे कुटुंबासमवेत राहत होते. मंगळवारी दुपारी परिसरातील एका व्यक्तीने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला.

आतून काही प्रतिसाद येत नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता, त्यांना अतुल यांचा मृतदेह गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. संबधित व्यक्तीने आरडाओरड (Pune Crime News) केली असता, परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी दार उघडून बघितले असता, अतूल यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचा मृतदेह खाली निपचीत पडल्याचे दिसून आले.

दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले. यावेळी पोलिसांनी घराची पाहणी केली असता अतुल यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. यामध्ये मी पत्नीचा गळा आवळून व दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांचा खून केला.

तर मी स्वतः आत्महत्या (Crime News) करीत असल्याचे नमूद होते. त्यानुसार पोलिसांनी संबधीत विहिरीच्या ठिकाणी पाहणी केली. विहिरीतील पाणी जास्त असल्याने मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर अतुल यांनी असं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं? याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : किती वर्षे दारू पिल्यानंतर लिवर खराब होतं? डॉक्टरांचा खुलासा वाचून आजच प्यायची बंद कराल

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

Pressure Cooker Cleaning: प्रेशर कुकरच्या शिटीमध्ये घाण साचलीये? या सोप्या पद्धतीने 2 मिनिटांत करा साफ!

Weather Update: 60KMPH वेगाचा सोसाट्याचा वारा अन् मुसळधार धारा; 5 दिवस 7 राज्यात धुव्वाधार पाऊस

Bhaubeej 2026 Wishes : सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती! भाऊबीजेनिमित्त पाठवा हे मनाला भिडणारे शुभेच्छा संदेश; नात्यात वाढेल गोडवा

SCROLL FOR NEXT