Akola Crime News: अकोल्यात ३० वर्षीय विवाहितेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या; मूर्तीजापूर परिसरात खळबळ

Murtijapur News मूर्तीजापूर येथे एका ३० वर्षीय विवाहित महिलेने रेल्वेसमोर उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
akola news A 30-year-old married woman ended her life by jumping under a train in murtijapur
akola news A 30-year-old married woman ended her life by jumping under a train in murtijapurSaam TV
Published On

Akola Crime News: अकोला जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. मूर्तीजापूर येथे एका ३० वर्षीय विवाहित महिलेने रेल्वेसमोर उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. काजल कांबे (वय ३०) असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. (Latest Marathi News)

akola news A 30-year-old married woman ended her life by jumping under a train in murtijapur
Darshana Pawar News: MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

काजलचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले असून ती मूर्तिजापूर (Akola News) येथील प्रतिष्ठित डॉक्टर राजेश कांबे यांची सून आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काजलचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तिने आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३० वर्षीय काजल कांबे स्वतःची स्कूटर घेवून मंगळवारी दुपारच्या सुमारास चिखली गेट परिसरातील रेल्वे ट्रॅकवर गेल्या. पुणे-अमरावती सुपर फास्ट रेल्वे येताच त्यांनी समोर उडी घेतली. रेल्वे चालकाच्या लक्षात येतात गाडीचे ब्रेक लावण्यात आले.

akola news A 30-year-old married woman ended her life by jumping under a train in murtijapur
Mumbai Crime News: प्रेमाचा भयानक अंत! धावत्या रिक्षातच प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवलं; मुंबईतील धक्कादायक घटना

मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. काजलची स्कूटी रस्त्याच्या कडेला स्कुटर उभी होती. रेल्वेवरुळाजवळ त्यांची देखील पर्स आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काजलचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com