Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Pune Contractor Kidnapping And Killed Case: पुण्यातील डोणजे गावामध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक विठ्ठल सखाराम पोळेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादाक घटना घडली आहे. सिंहगड पायथा परिसरात फिरायला गेले असता त्यांचे अपरहण करण्यात आले. आणि अवघ्या एका तासात त्यांची हत्या करण्यात आली. मृतदेहाचे तुकडे करून ते खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून देण्यात आले. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. तर या हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डोणजे गावामध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक विठ्ठल सखाराम पोळेकर (७० वर्षे) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोळेकर हे नेहमीप्रमाणे गावानजीक असलेल्या सिंहगडाच्या पायथ्याला मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. खंडणीसाठी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. पोळेकर घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आले. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली. शुभम पोपट सोनवणे, मिलिंद देविदास थोरात, रोहित किसन भामे यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबू किसन भामे हा अद्याप फरार आहे. रोहित आणि योगेश हे सख्खे भाऊ आहेत. सर्व आरोपी २२ ते २४ वयोगटातील आहेत. शुभम आणि मिलिंद हे दोघे अहमदनगरचे असून ते सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये कामाला होते. त्यांना पैशांचे आमीष दाखवून योगेशने त्यांचा पोळेकर यांची हत्या करायला लावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पोळेकर १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सिंहगड किल्ल्याजवळ फिरण्यास गेले होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले. आरोपी योगेश भामे याने पोळेकर यांच्याकडे आलिशान मोटारीसह खंडणीची मागणी केली होती. पोलिसांना योगेश आणि त्याचा भाऊ रोहित किसन भामे यांनी पोळेकर यांचे अपहरण केल्याचा संशय होता.

आरोपी मोटारीतून नाशिकच्या दिशेने गेले असून त्यात भामे याच्यासमवेत शुभम सोनवणे आणि मिलिंद थोरात असल्याचे समोर आले. पोलिसांनी नाशिकमध्ये आरोपींचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी रेल्वेने मध्यप्रदेशमधील जबलपूरला गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जबलपूर पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना रविवारी अटक केली. याप्रकरणी तिघे अटकेत असून मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT