cyber crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: हॅलो मी पोलिस उपायुक्त बोलतोय, पुण्यातील महिलेचा फोन खणखणला, 20 लाखांचा गंडा बसला

Pune Police Commissioner: सायबर भामट्याने पुण्यात एका ७१ वर्षीय महिलेकडून वीस लाख रुपये उकळले. सायबर भामट्याने या महिलेला मी पोलिस आयुक्त बोलतोय असे सांगून तिची फसवणूक केली.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

पुण्यामध्ये एका महिलेला २० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर भामट्याने पुण्यात एका ७१ वर्षीय महिलेकडून वीस लाख रुपये उकळले. सायबर भामट्याने या महिलेला मी पोलिस आयुक्त (Police Commissioner) बोलतोय असे सांगून तिची फसवणूक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर भामट्याने महिलेची फोनद्वारे फसवणूक केली आहे. या फोनवर मी पोलिस आयुक्त बोलतोय असे म्हणत 'मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केले आहे. आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्हाला अटक करावी लागेल. अटक केल्यानंतर मुंबईमध्ये ठेवावे लागेल. त्याचबरोबर तुमची पेन्शन बंद करण्यात येईल.', असे सांगत भामट्याने महिलेच्या मोबाइलवर एक पीडीएफ पाठवून तिला भीती दाखवून तब्बल २० लाख रुपये उकळले.

हसन मुश्रीफ यांच्यावर काही महिन्यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. आता थेट ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये या महिलेला आरोपी केल्याचे सांगत सायबर भामट्याने महिलेची फसवणूक करत तिच्याकडून २० लाख रुपये उकळले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे आणि आप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्यात गैरव्यवहार प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. या फसवणूक प्रकरणात आता ईडीच्या बनावट अधिकाऱ्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT