Bopdev Ghat Saam Tv
मुंबई/पुणे

Bopdev Ghat: बोपदेव घाट धोक्याचा! ३ दिवसांत अत्याचाराच्या २ घटना, पुणे पोलीस आहेत कुठे?

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

पुण्यातील बोपदेव घाट सुरक्षित नसल्याच्या गेल्या दोन दिवसांत अनेक घटना समोर आला आहे. बोपदेव घाट धोकादायक असून विनयभंग, अत्याचार, चोरी आणि धमकावल्याच्या घटना सासत्याने घडत आहेत. बोपदेव घाटात फिरायला येणाऱ्या तरुण-तरुणींना धमकावून लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत.

गुरुवारी घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेपूर्वीही अनेकवेळा विनयभंग, चोरी आणि धमकावण्याच्या सातत्याने घटना याठिकाणी घडलेल्या आहेत. जवळच्या परिसरात मोठी महाविद्यालये असल्याने परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून या भागात अनेक तरुण-तरुणी शिक्षणासाठी येतात. त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना धमकावून अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

बोपदेव घाटातील लुटमारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, संबंधित घटना कमी होताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना कायद्याची किंवा पोलिसांची भीती आहे की नाही? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या बोपदेव घाटामध्ये सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना गुरूवारी रात्री घडली. २१ वर्षीय तरुणीवर ३ अज्ञात तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणी आपल्या मित्रासोबत बोपदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस तिन्ही आरोपीचा शोध घेत आहेत.

तीन दिवसांपूर्वी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे कारमधून अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली. कारचालक राजेखाँ करीम पठाण (३६ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्यावेळी राजेखाँ मोटारीतून तेथे आला. त्याने एका मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. या ठिकाणी जोडप्यांना बंदी आहे असे सांगून त्याने तरुणी आणि तिच्या मित्राचा मोबाइलमध्ये फोटो काढला. तरुणीला धमकावून त्याने तिला कारमध्ये बसवले. त्यानंतर कोंढव्याच्या खडी मशीन चौकात नेऊन तिचा विनयभंग केला.

कोंढवा पोलिसांकडून बोपदेव घाटात पोलिस मदत केंद्र उभारण्यात आलेले आहे. पण याठिकाणी पोलिस पूर्णवेळ थांबत नाहीत. याचाही गैरफायदा घेण्यात येतो. पोलिसांची केवळ गस्त याठिकाणी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याच पोलिस मदत केंद्राच्या आजूबाजूला सदर गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.

कोंढवा पोलिस ठाण्यात एकूण १४० च्या आसापास पोलिस कर्मचारी संख्या आहे. ही संख्या २००८ मधील लोकसंख्येच्या आधारावर कार्यन्वित करण्यात आलेली आहे. आताच्या लोकसंख्येच्या आधारावर पोलिसांची संख्या ही किमान २५० ते २६० असायला हवी. मात्र पोलिसांची संख्या प्रत्यक्षात तेवढी नाही. त्यामुळे यातून पोलिसांच्या मर्यादा स्पष्ट होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मराठ्यांचे मंत्री, खासदार, आमदार मराठ्यांकडे लक्ष देत नाहीत, मनोज जरांगेंनी व्यक्त केली खंत

Raju Shetti : तिसऱ्या आघाडीवर शरद पवार यांची मिश्किल टिप्पणी, राजू शेट्टी संतापले; म्हणाले...

Pune Shocking News : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा संशयास्पद मृत्यू; पुण्यातील खळबळजनक घटना

Rohit Pawar : विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या नांग्या ठेचणार, रोहीत पवारांची जहरी टीका

Pravin Tarde : आता शिव्या द्यायच्या झाल्या तरी मराठीत द्या; प्रवीण तरडे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT