Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: दात आहेत की कैची! पुण्यात रिक्षाचालकाने चावा घेत प्रवाशाचा कानच तोडला

Pune Argument Between Rickshaw Driver and Passenger: दात आहेत की कैची! पुण्यात रिक्षाचालकाने चावा घेत तोडला प्रवाशाचा कान

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बादवे

Pune News: पुण्यात रिक्षाने प्रवास करणारे अनेक प्रवाशी आहेत. पुण्यातील काही रिक्षाचालक जास्तीचे भाडे आकारून प्रवाशांना लूटत असल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील अथवा स्वत: अनुभवल्या देखील असतील. अशात पुण्यात रिक्षाचालकाच्या दादागिरीने एका प्रवाशाला आपला कान गमवावा लागला आहे. रिक्षाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाने एक प्रवाशाच्या कानाचा लचका तोडला आहे. (Latest Crime News)

अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री एक सुमारास स्वारगेट बसस्थानकाजवळील सातारा रोड येथे ही घटना घडली आहे. संतोष चव्हाण असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. गुरुवारी रात्री संतोश रिक्षा थांब्याजवळ आले होते. यावेळी रिक्षाच्या भाड्यावरून त्यांच्यात आणि रिक्षा चालकामध्ये बाचाबाची झाली. पुढे त्यांचं भांडण हाणामारीपर्यंत पोहचलं. यात संतोश यांच्या कानाचा चावा घेत लचका तोडण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करतात. ते त्यांच्या मुळगावी अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानक परिसरात आले होते. त्यावेळी एका रिक्षाचलाकासोबत भाड्याच्या कारणातून वाद झाला. त्यावेळी तेथील काही रिक्षाचालकांनी त्यांना मारहाण केली.

दरम्यान, वाद झालेल्या रिक्षाचालकाने (Auto) त्यांच्या कानाच्या वरच्या भागाचा चावा घेत त्यांना जखमी केलं. चव्हाण यांनी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी चव्हाण यांनी पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षाचलकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT