Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: सहकारी महिलेला ऑफिसमध्ये घेतलं चुंबन; पुण्यात ७० वर्षीय वृद्धाचं कृत्य

Pune Crime News: एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने कामावर असताना सहकारी महिलेचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर तिला जवळ खेचत जबरदस्ती चुंबनही घेतलं.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही | पुणे, १८ डिसेंबर २०२३

Pune Crime News

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने कामावर असताना सहकारी महिलेचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर तिला जवळ खेचत जबरदस्ती चुंबनही घेतलं. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजीव विनायक विळेकर (वय ७०) असं गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजीव हा पुण्यातील (Pune News एका ऑफिसमध्ये काम करतो. याच ऑफिसमध्ये पीडित महिला देखील कामाला आहे.

दरम्यान, रविवारी (१७ डिसेंबर) महिला कामावर असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने पीडितेकडे चुंबनाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर त्यांनी महिलेला जबरदस्तीने खेचत तिचं चुंबन देखील घेतलं.

या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेने तातडीने डेक्कन पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीनुसार डेक्कन पोलिसांनी ७० वर्षीय आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT