पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गुजरात येथील एका ३५ वर्षीय तरुणाने २३ वर्षीय तरुणीसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख केली. त्यानंतर जवळीक वाढवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तरुणाने पीडित तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून गुजरातला नेलं. तेथेही तिच्यावर वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पुणे (Police) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
काय आहे प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी ही मुळ नेपाळची असून सध्या ती पुण्यातील (Pune) ढोले पाटील रस्ता परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिची झाकीर ईस्माईल झवेरीवाला (वय ३५, रा. गुजरात) या तरुणाशी इन्स्टाग्रावरून ओळख झाली होती. आपण अविवाहित असल्याचं सांगत झाकीरने तरुणीसोबत जवळीक साधली. तिला लग्नाचं अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.
इतकंच नाही तर आरोपी झाकीर याने पीडितेला लग्नाचं अमिष दाखवून गुजरातला नेलं. तेथे त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, तरुणीने त्याच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, तरुणाचे दुसरे लग्न झाल्याचे तरुणीला समजले. त्याने तिला गुजरात येथील घरात डांबून ठेवून तिला ऍसीड फेकून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली. दरम्यान, झाकीर हा त्याच्या पहिल्या पत्नीला भेटायला गेल्यानंतर तरूणीने डांबून ठेवलेल्या ठिकाणाहून स्वतःची सुटका करून घेत पुणे गाठले. त्यानंतरही झाकीरने तिला वेगवेगळ्या फोन नंबरचा वापर करुन "तु कोठेही गेली तरी मी तुला सोडणार नाही' अशी धमकी दिली.
आरोपी झाकीरकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून तरुणीने अखेर पुणे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तरुणीने सांगितल्यानुसार विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडित तरुणीची गुजरातमधील इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली होती, त्यानंतर त्यांची प्रत्यक्षात भेट होऊन ते गुजरात येथे पाच सहा महिने राहिले आहेत. त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.