Chhattisgarh Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात किरकोळ कारणावरून वाद, तरुणाची भररस्त्यात हत्या; ८ जणांना जन्मठेप

Pune Youth Killed Case: पुण्यामध्ये किरकोळ वादातून तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Priya More

रस्त्यावरील किरकोळ वादातून पुण्यात तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९ जानेवारी २०२१ ला शुभम विलास डोंगरे यांची हत्या झाली होती. रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या केल्याप्रकरणी वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषी ठरलेल्या प्रत्येक आरोपीला जन्मठेपेसह १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास सुनावण्यात आला आहे.

सुनील शंकरराव शिंदे (वय ४२), सतीश शंकर शिंदे (वय ३८), बबन दगडू शिंदे (वय ५३), बाळू मारुती गोसावी (वय ४८), ऋषिकेश सुरेश शिंदे (वय ३३), दगडू ऊर्फ सुभाष अशोक खंडाभोर (वय ३२), शंकरराव अनंतराव शिंदे (वय ७२) आणि पंकज बाळू खंडाभोर (वय ३५, सर्व रा. मावळ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सरकारी पक्षाने खटल्यात १२ साक्षीदार तपासले. मृत तरुणाची आई आणि त्याचा भाऊ हे दोन प्रमुख प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच वैद्यकीय पुरावे हे दोष सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे ठरले. माजी सैनिक विलास डोंगरे यांचा मुलगा शुभम याचा आरोपींशी रस्त्यावरून किरकोळ कारणावरून वाद झाला होता.

या वादातून आरोपींनी सुरुवातीला त्याच्यावर हल्ला केला आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर लाकडी दांडके व इतर वस्तूंनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे ३० दिवस तो कोमात होता. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी टेंपल ट्रस्टकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत

Weather Update: थंडी गायब, पावसाचा धुमाकूळ सुरूच; १० ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज; ताशी ६० किमीच्या वेगाने वारे वाहणार

Friday Horoscope : शुक्रवारी ५ राशींचं नशीब चमकणार! कन्या राशीला घर-गाडीचा योग, 'या' राशींचं टेन्शन वाढणार?

शिक्षकांचा ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार; प्रशासकीय कामांविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

SCROLL FOR NEXT