Pune News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune News: ७० ते ८० जणांनी मिळून केली मारहाण, पुण्यात दोन गटात तुफान राडा

Pune News: पुण्यातील हडपसर भागात दोन गटात तुफान राडा झाला आहे. ७० ते ८० जणांनी मिळून चार-पाच जणांना मारहाण केली असून यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune News

अक्षय बडवे

पुण्यातील हडपसर भागात दोन गटात तुफान राडा झाला आहे. ७० ते ८० जणांनी मिळून चार-पाच जणांना मारहाण केली असून यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकही झाली असून परिसरातील झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. हडपसर पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख शेख वाढदिवसानिमित्त फटाके फोडत होते. यावेळी बाळासाहेब आवटी यांनी फटाके घराच्या बाहेर फोडू नका अशी विनंती केली. त्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर जवळपास ७० ते ८० जणांचा जमाव घटनास्थळी जमा झाला आणि या जमावाने बाळासाहेब आवटी यांच्यासह त्यांची पत्नी, अभिषेक सोनवणे, सनी आवटे यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. दगड आणि बेल्टने मारहाण करण्यात आली. यात हे चारही जण जखमी झाले आहेत. यावेळी दगडफेकही करण्यात आली असून परिसरातील झाडांचे नुकसान करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान हडपस पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Bhaji Benefits: थंडीत खा मेथीची भाजी, वजन होईल कमी अन् ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Maharashtra Live News Update: भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकने घेतला पेट

मुंबईत 'या' दिवशी समुद्राला मोठी भरती; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन|VIDEO

Thursday Horoscope: दत्त जयंतीला मिळणार 'या' ४ राशींना धनलाभ; मेषला गुंतवणुकीचा फायदा, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

World Largest Parrot: जगातील सर्वात मोठा पोपट कोणता?

SCROLL FOR NEXT