उत्तर प्रदेशमधून रुग्णांच्या आरोग्याशी खेळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. ह्रदयविकाराच्या शस्त्रक्रियेदरम्यान तब्बल २५० रुग्णांना बनावट पेसमेकर लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून वैद्यकीय पेशाला काळीमा फासणाऱ्या या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. समीर सर्राफ असं या डॉक्टरचं नावं असून सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीचा तो कार्डियोलॉजिस्ट आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये ज्यावेळी या डॉक्टरविरोधात ह्रदयाची शस्त्रक्रीया करून बनावट पेसमेकर लावल्याची तक्रार दाखल झाली. त्यावेळी खऱ्या अर्थाने या प्रकरणाला वाचा फूटली. बनावट पेसमेकर लावल्यामुळे त्या रुग्णाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान चौकशी समितीच्या तपासात सर्राफने एका रुग्णाकडून पेसमेकर लावण्यासाठी तब्बल १.८५ लाख रुपये घेतले होते, जे मूळ किंमतीपेक्षा दुप्पट होते. त्या पेसमेकरची मूळ किंमत ९६ हजार ८४४ होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान या डॉक्टरने २५० रुग्णांवर नकली पेसमेकर लावण्यासाठी या संबंधित कंपन्यांसोबत करार केला होता. नामांकीत कंपन्यांच्या नावाखाली बनावट पेसमेकर लावून पैस उखळण्याचं काम सुरू होतं. एवढंच नाही तर या कंपन्यांनी याच्या बदल्यात या डॉक्टरला ८ वेळा विदेश यात्रा घडवली आहे.
युनिव्हर्सिटीत मेडिकल साहित्य खरेदी करतानाही या डॉक्टरने अडीच कोटींचा घोटाळा केला होता. दरम्यान गॅझेटड अधिकारी आणि पोलिसांच्या चौकशीत डॉक्टर दोषी आढळला आहे. लाच घेताना या डॉक्टरचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्रकरण गंभीर असल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २०२२ पासून या डॉक्टरची चौकशी सुरू होती. त्याला अटक करण्यासंदर्भात सरकारला पत्र पाठवल्यानंतर परवानगी मिळाली. त्यानंतर डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.