Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: आम्ही आमदार आहोत सांगायचे, अन्... पुण्यात फसवणुकीचा भलताच प्रकार आला समोर

Pune Crime News: बनावट नोटा बनवण्याचा डेमो दाखवून सुरुवातीला त्यातून तयार केलेल्या काही नोटा देऊन खात्री पटवली जात असे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातून एक फसवणुकीचा वेगळा प्रकार समोर आला आहे. बनावट नोटा बनवण्याचा डेमो दाखवून 5.50 लाखांना गंडा घातल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशातील आमदार असल्याचं भासवून ही टोळी लोकांची फसवणूक करत होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. (Pune Crime News)

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बनावट नोटा बनवण्याचा डेमो दाखवून सुरुवातीला त्यातून तयार केलेल्या काही नोटा देऊन खात्री पटवली जात असे. त्यानंतर त्यांना तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना ही टोळी गंडा घालायची. या टोळीने एका व्यक्तीला तब्बल ५ लाख ३४ हजार रुपयांना फसवलं. (Latest Marathi News)

मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या व्यक्तीने आपले पैसे परत मागितले. त्यानंतर आरोपींनी या व्यक्तील जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी रुपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे आणि अशोक पाटील यांना ताब्यात घेतलं. राऊत हिने आपण मंत्री असून संजयकुमार पांडे याने उत्तर प्रदेशात आमदार असल्याचा बनाव केला. या टोळीने भारतीय चलनातील नोटा बनवणारे केमिकल असल्याचे सांगितले.

फिर्यादी यांना या केमिकलचा वापर करून त्यांना तिप्पट पैसे मिळून देतो असे सांगितले. या अमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी 5.34 लाख रुपये दिले, पण हा सगळा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांना आता कारवाई केली असून अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT