Pune Crime News 30-year-old women physical abuse by young man in baner area Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख, गोड बोलून तरुणीला हॉटेलवर नेलं; तरुणाने केलं भयानक कृत्य, पुण्यात खळबळ

Pune Crime News: पुण्यातील बाणेर परिसरात एका नराधमाने पिस्तुलाचा धाक दाखवून ३० वर्षीय तरुणीवर बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News Today: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात एका नराधमाने पिस्तुलाचा धाक दाखवून ३० वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, कोंढवा पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल (Crime News) केला असून घटनेचा तपास चतु:शृंगी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

राहुल चंद्रकांत यादव (रा. सोना अपार्टमेंट औंध रोड) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन महिन्यापूर्वी पीडित तरुणीची एका विवाहसंबधित साईटवरून आरोपी राहुलसोबत ओळख झाली होती. राहुल याने तरुणीचा विश्वास संपादन करत तिच्यासोबत जवळीक साधली.

मला तुला भेटायचं आहे, असं म्हणत आरोपी राहुलने २४ जूनच्या रात्री पीडित तरुणीला बाणेर परिसरात भेटायला बोलावलं. त्यानंतर पीडितेला हॉटेलमध्ये (Pune News) नेत पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर जबरस्तीने अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.

घडलेल्या प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने घडलेल्या घटनेबाबत कुणालाही सांगितले नाही. मात्र, आरोपी राहुल याने त्रास देणे सुरूच ठेवल्याने पीडितेने अखेर पोलिसांत (Police) धाव घेतली. दरम्यान, पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी राहुल चंद्रकांत यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिकचा तपास चतु:शृंगी पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT