Pune Loanikand Vaishnavi Jamkar Sucide News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : हुंड्यासाठी छळ! पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी, लग्नानंतर अवघ्या ८ महिन्यातच मृत्युला कवटाळले

Pune Crime News : पुण्यात सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवरा आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील लोणीकंद येथे विवाहितेची आत्महत्या

  • सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप

  • नवरा आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

  • पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू

Pune Loanikand Vaishnavi Jamkar Sucide News पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच, आणखी एका वैष्णवीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पीडित महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पुणे पोलिसांत सासू, साऱ्यांसह मृत महिलेच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणीकंद परिसरात राहणाऱ्या वैष्णवी जामकर यांचा ८ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून वैष्णवी यांचा छळ होत असल्याचा आरोप आहे.

तसेच छळ करून त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली जायची. सततच्या या जाचाला कंटाळून पीडित महिलेने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवी यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घडलेल्या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

वैष्णवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींविरोधात पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. पुण्यात पुन्हा एका वैष्णवीचा बळी गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, २२ वर्षीय इंजिनिअरचा घाबरून मृत्यू; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

SCROLL FOR NEXT