Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला, कारने धडक दिली; नंतर डोक्यात दगड घातला

NCP Leader Attacks Shiv Sena Workers: पुण्यामध्ये राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शिवसैनिक गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

Summary -

  • पुण्यात राजकीय वादातून जीवघेणा हल्ला

  • राष्ट्रवादीचे नेते उल्हास तुपे यांनी केला हल्ला

  • शिवसेना उपसंघटक दीपक कुलाळ गंभीर जखमी

  • कारने धडक देत नंतर दगडाने हल्ला करण्यात आला

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याने शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी कारने धडक दिली नंतर डोक्यात दगड घालत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उल्हास तुपे यांनी हा हल्ला केला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. काही दिवसांपूर्वी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारे दगडफेक करत भ्याड हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे हडपसरचे उपसंघटक दीपक कुलाळ यांच्यासह आणखी दोघांवर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उल्हास तुपे यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामागचे कारण राजकीय असल्याची चर्चा हडपसरमध्ये सुरू आहे.

उल्हास तुपे यांनी दीपक कुलाळ यांच्या अंगावर आधी स्कॉर्पिओ कार घातली त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाळीस-पन्नास गुंडांची टोळी घेऊन त्यांनी या दोन ते तीन शिवसैनिकांवर हल्ला केला. त्यात शिवसेनेचे पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ गंभीर जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर येथे घडला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी नेते उल्हास तुपे यांनी दगडफेक केली आणि मुलानी शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप दीपक कुलाल यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Mayors: राज्यातील १५ महापालिकांवर 'महिलाराज', कुठे कोण महापौर होणार? वाचा लिस्ट

Bigg Boss Marathi 6 : तन्वीला विशालशी पंगा पडणार भारी; रुचितानं केली बोलती बंद, पाहा VIDEO

Salman Khan: पुन्हा अडकला सलमान खान; दिल्ली हायकोर्टाने सलमान खानला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Red Mirchi Pickle : भरलेल्या लाल मिरचीचे चटपटीत अन् मसालेदार लोणचे कसे बनवावे? वाचा रेसिपी

Central Bank Recruitment: सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; ३५० पदांसाठी भरती; पगार १ लाख रुपये; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT