Mother Killed Son In Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! आईने चाकूने मुलाचा गळा चिरला, मुलीवरही सपासप वार

Mother Killed Son In Pune: पुण्यामध्ये महिलेने आपल्या ११ वर्षांच्या मुलाची चाकूने गळा चिरून हत्या केली. तर १३ वर्षांच्या मुलीवर देखील चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी झाली.

Priya More

Summary -

  • पुण्यातील वाघोलीत भयंकर हत्याकांडाची घटना घडली

  • आईने आपल्या दोन मुलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला

  • ११ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी

  • आरोपी महिला सोनी जायभायला पोलिसांनी अटक केली

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. आईनेच आपल्या पोटच्या मुलांवर प्राणघातक हल्ला केला. महिलेने चाकूने गळा चिरून मुलाची हत्या केली तर मुलीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरातील बाईफ रोडवर ही हत्याकांडाची घटना घडली. एका महिलेने आपल्या राहत्या घरात स्वतःच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून हत्या केली. या महिलेने आपल्या १३ वर्षांच्या मुलीवर देखील चाकूने सपासप वार केले. घरामध्ये अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिचा जीव वाचला पण तिची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनी संतोष जायभाय असं आरोपी महिलेचे नाव आहे. ती मुळची नांदेडच्या कंधार येथील असून सध्या वाघोली येथे बाईफ रोडवर आपल्या कुटुंबीयांसोबत राहत आहे. सोनीने आपल्या ११ वर्षांचा मुलगा साईराज संतोष जायभाय आणि १३ वर्षांची मुलगी धनश्री संतोष जायभाय या दोघांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला. तर धनश्री गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. या महिलेने हे कृत्य का केले? यामागचे कारण समोर आले नाही. पोलिस तिची चौकशी करत आहेत. कौटुंबिक वाद की मानसिक तणाव यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. वाघोलीत सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी निर्दयी घटना आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : खरेदीआधी वाचा सोन्याचे ताजे दर, २२k, २४k गोल्ड प्रति तोळा किती स्वस्त? वाचा एका क्लिकवर..

Maharashtra Live News Update: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना

Pune-Solapur Highway: पुणे-सोलापूर प्रवास सुसाट होणार, ६ उड्डाणपूल अन् 'या' ठिकाणी होणार सर्व्हिस रोड, वाचा मास्टरप्लॅन

Sabudana Papad : घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि क्रिस्पी साबुदाणा पापड, लगेच नोट करा रेसिपी

Pune News: सासू सरपंच, सासरे मुख्याध्यापक; चौधरी कुटुंबात सुनेचा छळ, गर्भपातही केला; त्रासलेल्या दिप्तीनं आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT